देशातील पहिलं डिजीटल बजेट : ७५ वर्षांवरील नागरिकांना यापुढे कोणताही कर भरावा लागणार नाही

Nirmala Sitharaman & Citizens over the age of 75

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला अर्थसंकल्प 2021-22 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (FM Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील हा तिसरा अर्थसंकल्प (Union budget of India) आहे. यंदाच्या अर्थसंकल्पावर कोरोना प्रादुर्भाव, मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर असं मोठं संकट होतं. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं. निर्मला सीतारमण यांच्या हातात आज खातेवहीऐवजी टॅब दिसला. देशातील हे पहिलं डिजीटल बजेट आहे.

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा –

यंदाच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आलाय. यापुढे वय वर्ष ७५ ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकर परतावा भरण्याची गरज नसल्याची तरतूद अर्थमंत्री सीतारमण यांनी केलीय. हा दिलासा ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याचाच अर्थ ७५ वर्षांवरील नागरिकांना यापुढे कोणताही कर भरावा लागणार नाही.

‘ज्येष्ठ नागरिकांना प्रणाम करत मी ही तरतूद जाहीर करतेय. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांत ७५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या वृद्धांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’ असं निर्मला सीतारमण यांनी संसदेसमोर म्हटलं.

सध्या एक मूल्यांकन सहा वर्षांसाठी पुन्हा उघडता येऊ शकते. ही मुदत तीन वर्षांपर्यंत कमी करण्यात आली आहे आणि कर चुकवण्याच्या गंभीर प्रकरणांमध्येही दर वर्षी पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न लपविल्यास ते दहा वर्षांपर्यंत उघडता येते.

तसेच, यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गासाठी मात्र कोणताही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, टॅक्स ऑडिटची मर्यादा ५ कोटींवरुन १० कोटी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परवडणाऱ्या घरांना ३१ मार्च २२ पर्यंत कर सवलत दिली जाईल, अशा काही महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्यात. शिवाय विमा क्षेत्रात आता ७४ टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा एक धाडसी निर्णय अर्थमंत्री सीतारमण यांनी जाहीर केला आहे.

मात्र, काही सामानांवर अॅग्रीकल्चर इन्फ्र सेस लावण्यात येणार आहे, याचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल, अशी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER