देशातील पहिला CNG ट्रॅक्टर लॉन्च होणार!

नवी दिल्ली :- शेतकर्‍यांना (Farmers) आता पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) वाढत्या किमतींपासून दिलासा मिळणार आहे. स्कूटर, कार आणि बसेसनंतर आता रस्त्यावर आणि शेतात सीएनजी (CNG) बसविण्यात आलेले ट्रॅक्टरही फिरताना दिसणार आहेत.

रावमेट टेक्नो सोल्युशन आणि टोमॅसेटो अचिली इंडियाद्वारे सीएनजी बसविण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा फायदा शेतकऱ्यांना होईल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल. ‘सीएनजी’ एक स्वच्छ इंधन असल्यामुळे कार्बन आणि इतर प्रदूषित कण फार कमी उत्सर्जित होतात. ‘सीएनजी’ ट्रॅक्टरचे मायलेज डिझेलच्या तुलनेत जास्त आहे. रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार होत असतात. या तुलनेत ‘सीएनजी’च्या चढ-उतारांच्या किमती कमी असणार आहे.

‘सीएनजी’ टँकपासून सील असल्यामुळे रिफीलिंगच्यावेळी स्फोट होण्याचे प्रमाण कमी असते. ‘वेस्ट टू वेल्थ’ म्हणजेच कचऱ्यापासून मौल्यवान वस्तू बनविण्याच्या पर्यायाला पुढे बळकटी मिळते. बायो सीएनजी तयार करण्यासाठी पेंढ्यांचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे केवळ शेतकऱ्यांचे उत्पन्नच नाही तर पेंढ्या जाळल्यामुळे होणारे प्रदूषण कमी होईल.

१२ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) देशातील पहिला ‘सीएनजी’ फिटेड ट्रॅक्टर लॉन्च करणार आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, महामार्ग राज्यमंत्री व्ही.के. सिंह आणि राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यावेळी उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER