आत्मनिर्भर भारताचे ध्येय साकारण्यासाठी देशाला टिळकांच्या कर्मयोगाची गरज – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई :- लोकमान्य टिळकांनी त्यांच्या गीतारहस्य या ग्रंथात भगवगीतेचा अर्थ कर्मयोगानुसार सांगितला आहे. त्यांनी भगवद्गगीतेवर केलेल्या भाषणांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या संपूर्ण पिढीला प्रेरित केले. आज कर्म करण्याची मोठी आवश्यकता आहे. कर्म केल्याशिवाय कोणतेही काम होऊ शकणार नाही यासाठी परीश्रम, त्याग करणे गरजेचे आहे.आत्मनिर्भर भारताचे धेय साकारण्यासाठी देशाला टिळकांच्या कर्म योगाची गरज आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले.

लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दी वर्षा निमित्त राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यास यांच्या वतीने मैसूर असोसिएशन सभागृह,माटुंगा येथे गीता जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.

राज्यपाल श्री कोश्यारी म्हणाले, भगवद्गगीत गीते मध्ये भक्तियोग, संन्यास योग, कर्मयोग आणि ज्ञान योगाबद्दल बोलले आहेत. हे लक्षात घेता राज्यपाल म्हणाले की गीता रहस्यात लोकमान्य टिळकांनी आत्मनिर्भरहोण्यासाठी कर्मयोगाची आवश्यकता आहे.

शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल यांच्यासह जागतिक नेत्यांना भगवद्गीतेने प्रेरणा दिली.

राज्यपाल श्री .कोश्यारी म्हणाले, गीता ग्रंथ वाचत असताना प्रत्येक वेळी नवीन अनुभव येत असतो. लोकमान्य टिळक यांनी गीतारहस्य ग्रंथाचे अध्ययन करुन भारतीयांना व्याख्या दिली आहे. आपल्या ग्रंथाच्यामाध्यमातून अनेक क्रांतीकारकाना, स्वातंत्र्य सैनिकाना, कवी, लेकख यांना प्रेरणा दिली आहे.

गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे.

आजच्या कलयुगामध्ये कर्मयोगाची नितांत गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने कर्म, अर्थ, काम आपल्या आचरणात उतरवणे गरजेचे आहे.

दिनकर स्मृती न्यास संस्थेचे कार्य अतिशय चांगले आहे. यापुढेही या संस्थेने आपले कार्य निरंतरपणे चालू ठेवावे. या संस्थेच्या पुढील कार्यासाठी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी 5 लाख रुपये देणगी देण्यात आल्याची घोषणा केली .

सुरुवातीला कार्यक्रमांची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन तसेच दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या वतीने राज्यपाल श्री. कोश्यारी यांना हिंदी अनुवादामध्ये असलेली भगवगीताग्रंथ भेट म्हणून देण्यात आली. रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासचे नीरज कुमार,वरिष्ठ रंगकर्मी मुजीब खान, मुंबई विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख रातन कुमार पाणडेय,उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आर पी सिह, चित्रपट निर्देशक पंकज नारायण, लोकमान्य टिळक स्वराज भूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश सिलम यावेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER