देशाला PM आवास नव्हे तर मोकळा श्वास हवा; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

PM Modi - Rahul Gandhi - Maharashtra Today

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. दरम्यान, काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सतत मोदी सरकारवर (Modi Goverment) निशाणा साधत असतात. राहुल गांधी यांनी आज ट्विटरवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत.

यापूर्वी राहुल गांधींनी कोरोना संक्रमित रुग्णांना पुरेसे ऑक्सिजन देण्याचे आवाहन केले होते. रुग्णांना वाचवण्याची काही सूचनाही केल्या. ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी म्हणाले की, “देशवासियांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लस देणे महत्वाचे आहे. योग्य आकडेवारी आणि नवे स्ट्रेनचे विश्लेषण, दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य करणे. दुर्दैवाने केंद्र सरकार हे करू शकणार नाही हे सिद्ध करत आहे.” असे ट्विट त्यांनी केले होते.

आता राहुल गांधींनी काल ट्विटवर आणखी पोस्ट शेअर केले आणि लिहिले की, ‘The Movid Pandemic’ या आलेखाच्या माध्यमातून राहुल गांधींनी सांगितले की, “केंद्राकडे संपूर्ण लॉकडाऊनची मागणी केली होती. गेल्या वर्षीचा अनियोजित लॉकडाऊन लोकांवर प्राणघातक हल्ला झाला. त्यामुळे मी संपूर्ण लॉकडाऊनच्या विरोधात आहे. मात्र, पंतप्रधानांचे अपयश आणि केंद्राची शून्य रणनीती देशाला संपूर्ण लॉकडाऊनकडे ढकलत आहे. अशा परिस्थितीत गरीबांना आर्थिक पॅकेज आणि त्वरित सर्व प्रकारच्या मदतीची गरज आहे. त्याचबरोबर, ‘देश को PM आवास नहीं, सास चाहिए…'” असे ट्विट राहुल गांधींनी केले.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button