‘नेहरु-गांधी कुटुंबामुळे देश आजही जिवंत’, शिवसेनेची केंद्रावर सडकून टीका

मुंबई : मागील १० दिवसांत  हिंदुस्थानात ३६ हजार ११० कोरोनाबळी गेले. हे आकडे धडकी भरवणारे आहेत. अमेरिका, ब्राझीलला आपण मागे टाकले. हे चित्र बरे नाही. जगाला आता हिंदुस्थानची भीती वाटू लागली आहे. हिंदुस्थानात जाण्यापासून व्यापार-उद्योग करण्यापासून त्या देशांनी आपल्या लोकांना रोखले आहे. हिंदुस्थानात विमान आणि प्रवासबंदी केली. याचा आर्थिक फटका हिंदुस्थानला बसत आहे. तरीही देश तग धरून राहिलाय तो ७० वर्षांपासून पंडित नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी (Rajiv Gandhi), नरसिंह राव (Narasimha Rao), मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प व आत्मविश्वासावरच.

ती पुण्याई मोठी आहे. पंतप्रधान मोदी यांना देश सावरण्यासाठी कठोर परिश्रम व राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल. जागतिक मंचावर हिंदुस्थानची अवस्था बिकट होणे बरे नाही!- असे म्हणत शिवसेनेने  आजच्या सामानातून केंद्रावर टीकास्त्र सोडले आहे. युनिसेफने भीती व्यक्त केली की, कोरोना व्हायरस भारतात ज्या वेगाने पसरत आहे त्यामुळे भारताकडून जगाला धोका निर्माण झाला आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यात जास्तीत जास्त देशांनी भारताला मदत करावी, असे आवाहनही युनिसेफने केले आहे. युनिसेफच्या या आवाहनावरूनही शिवसेनेने केंद्राचे कान टोचले. हिंदुस्थानपासून जगाला धोका असल्याची चिंता आता ‘युनिसेफ’नेही व्यक्त केली आहे. कोरोना ज्या वेगाने हिंदुस्थानात पसरत आहे त्यापासून संपूर्ण जग संकटात येईल. त्यामुळे हिंदुस्थानला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी इतर देशांनी जास्तीत जास्त मदत करावी, असे युनिसेफतर्फे सांगण्यात आले आहे.

बांगलादेशने हिंदुस्थानला १० हजार रेमडेसिवीर वायल्स देणगीदाखल पाठवले. भूतानसारख्या देशाने ऑक्सिजन पाठवला. नेपाळ, म्यानमार, श्रीलंकासारखे देशही आत्मनिर्भर हिंदुस्थानला मदतीचा हात पुढे करीत आहेत. स्पष्ट सांगायचे तर आजही हिंदुस्थान तग धरून आहे तो नेहरू-गांधी यांनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेवर. नाही तर कोरोनाच्या लाटेत सव्वाशे कोटी लोक कधीच नष्ट झाले असते, असा दावाही शिवसेनेनं केला आहे.  पाकिस्तान, रवांडा, कोंगोसारखे देश भारताला मदत करत आहेत. आज राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ही वेळ आत्मनिर्भर म्हणवून घेणाऱ्या हिंदुस्थानवर आली. हिंदुस्थानातील पेटलेल्या चितांचा धूर आजूबाजूच्या देशांना गुदमरून टाकत आहे.

या धुरातून कोरोना (Corona) आपल्या देशात पसरू नये यासाठी अनेक गरीब देशही हिंदुस्थानला दयाबुद्धीने मदत करू लागले आहेत. गोरगरीब देश आपल्याला त्यांच्या ऐपतीने किडुकमिडुक मदत करीत असले तरी आपले सन्माननीय पंतप्रधान महोदय २० हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्प थांबवायला तयार नाहीत. दिल्लीत नवे संसद भवन, त्यात पंतप्रधानांचा नवाकोरा महाल या योजनांवर हजारो कोटी रुपये उधळायचे व त्याच देशाने बांगलादेश, भूतान, श्रीलंकासारख्या देशांकडून कोरोना निवारणासाठी मदत स्वीकारायची, याची खंत कोणाला वाटू नये याचे आश्चर्य वाटते, असेही शिवसेनेने म्हटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ सुरू असताना तिसऱ्या लाटेची धडक यापेक्षा जोरात बसेल, असे तज्ज्ञ  सांगतात; पण भाजपचे लोक आजही प. बंगालात ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची राजकीय कोंडी करण्याचा नाद सोडायला तयार नाहीत.

एखादे संवेदनशील किंवा राष्ट्रभक्त सरकार असते तर राजकीय फायद्या-तोट्याचा विचार न करता सर्वच पक्षांच्या प्रमुखांचे एक राष्ट्रीय पथक बनवून या संकटाशी कसे लढावे यावर सल्लामसलत केली असती, असेही शिवसेनेने आजच्या अग्रलेखात म्हटले आहे. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोग्य मंत्रालयाची सूत्रे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासारख्या धावपळ करणाऱ्या  कार्यक्षम मंत्र्याकडे देण्याचे सुचवले. त्यामागची तळमळ समजून घ्या. देशाचे आरोग्य खाते सपशेल अपयशी ठरल्याचाच हा पुरावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button