देशाची वाटचाल पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

narendra modi

मुंबई :- साडेचार वर्षापूर्वी कोणी विचार केला नसेल, अशा अत्यंत प्रभावी विविध विकासात्मक कामामुळे देश लवकरच पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे. ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये देशाने आपले मानांकन सुधारले आहे. १७० व्या क्रमांकावरुन देश ७७व्या क्रमांकावर पोहोचला आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. रिपब्लिक टिव्हीद्वारे आयोजित दोन दिवसांच्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘देशाची दशा आणि दिशा’ याबाबत त्यांनी सविस्तर आढावा घेतला. भाषणाच्या सुरुवातीला मुंबईतील हॉस्पिटल दुर्घटनेतील बळींप्रती प्रधानमंत्र्यांनी शोक भावना व्यक्त केल्या.

ही बातमी पण वाचा : मी पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहात नाही : नितीन गडकरी

गेल्या साडेचार वर्षात देशाने नेत्रदीपक प्रगती केली. पूर्वी फक्त ट्रेनने प्रवास करणारे भारतीय प्रवासी आता हवाई वाहतुकीला प्राधान्य देत आहेत. हवाई वाहतुकीचा वाढलेला व्याप बघता देशाला एक हजार नवी विमाने वाढवावी लागली. यापूर्वी इतकी वर्ष केवळ ४५० विमानांमार्फत हवाई वाहतूक होत होती. रिक्षावाला, भाजीवाला, चहावाला यांसारखी सामान्य माणसेही ‘भीम ॲप’ सारख्या माध्यमातून डिजिटल झाली आहेत. यापूर्वी कल्पना न केलेली जलवाहतूक सुरू करण्यात आली आहे. देशातच विना इंजिनच्या हायस्पीड रेल्वेचे परीक्षण करण्यात आले आहे. एकाचवेळी शंभर सॅटेलाईट सोडण्याचे लक्ष देश गाठू शकला आहे. स्टार्ट अप  किंवा क्रीडा अशा सर्व क्षेत्रात देशाचे नाव घेतले जात आहे.

ही बातमी पण वाचा : मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकण्याचे आश्वासन पूर्ण करणार : आठवले

सन २०१४ पूर्वी आणि आताच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल घडला आहे असेही मोदी यांनी सांगितले, ते म्हणाले देशातील केवळ ४० टक्के परिसर स्वच्छता अभियानात सहभागी होता, आता सुमारे ९७ टक्के परिसर स्वच्छ झाला आहे. देशातील सुमारे५०  टक्के लोकांकडे बँक खाती नव्हती आता देशातील प्रत्येक परिवार बँकिंग क्षेत्राशी संलग्न झाले आहे. पूर्वी ६५ लाख उद्योजक करासाठी नोंदणी करत आता केवळ दीड वर्षात ५५ लाख नव्या उद्योजकांनी नोंदणी केली आहे. देशात मोबाईल तयार करणाऱ्या केवळ दोनच कंपन्या होत्या, आता १२०  कंपन्या देशात मोबाईल तयार करत आहेत. रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक या सगळ्या क्षेत्रातील कामे वेगाने होत आहेत. शंभर नवे विमानतळ व हेलीपॅड तयार होत आहेत. ३० वर्षापासून अडकलेली कामे मार्गी लागली आहेत. देशात रस्ते, मेट्रो, फ्लाय ओव्हरच्या निर्माणासह नवा भारत निर्माण होत आहे.

ही बातमी पण वाचा : मेट्रो भूमीपूजनाच्या कार्यक्रमावरून शिवसेना आणि भाजपमधे तणाव