देशात रेमडेसिवीरचा तुटवडा आणि भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय; हे भाजपाचे राजकारण नाही तर काय सुरू आहे – नवाब मलिक

Nawab Malik - Maharastra Today

मुंबई : देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सुरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे हे राजकारण नाही तर काय आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्वीट करुन भाजपाच्या (BJP) गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत वाटपाच्या राजकारणावर सवाल उपस्थित केला आहे.

कोरोनाने देशात आणि राज्यात गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यातच केंद्रसरकारकडून राज्यात लस वाटपात राजकारण सुरू असतानाच गुजरातमधील सुरत येथील भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत आहे. हे ट्वीट करत नवाब मलिक यांनी कोरोना काळातील भाजपाचे राजकारण देशातील जनतेसमोर आणले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button