अंतिम संस्कारांचा खर्च वाढला, सरकारच्या हस्तक्षेपाची होतीये मागणी

Maharashtra Today

कोरोनाच्या (Corona) वाढत्या आलेखासोबतच माणूसकीचा स्तर ढासळत असल्याचं चित्र आहे. बऱ्याच ठिकाणी रुग्णांना औषधं मिळत नाही आहेत. जिथं मिळतात तिथं औषधांच्या किंमती पाच पटीनं वाढलेल्या आहेत. अनेक रुग्णालांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना वाऱ्यावर सोडलंय. अनेकांचा बळी जातोय. जीवन मरणाची लढाई सुरु असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकार (Centre Govt) कोरोना रोखण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत असल्याची विधानं नेतेमंडळी करत आहेत. उपचारांच्या वाढीव दरांशी सामना करणाऱ्या सामान्य जनतेला इतर अनेक गोष्टींसाठी पै पैसाठी दरोदार भटकण्याची वेळ आली आहे. पाच- पाच किलोमीटरला रुग्णवाहिका नेण्यासाठी १० हजारांहून भाडं वसुल केलं जातंय. अशा परिस्थीतीतून कोरोनाग्रस्त रुग्णाला वाचवण्यात अपयश आलं तर आता अंत संस्कार करणं ही अशक्य होईल अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबर तडाखा भारताला बसला आहे. यामुळं मृतांच्या संख्येत तुफान वाढ (Cost of the funeral increase) होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा अंतिम संस्कार करायचा कसा? असा प्रश्न नातेवाईकांना पडतो आहे. याला कारण आहे अंतिम संस्कार करण्यासाठी उकळले जात असलेले पैसे, अंतिम संस्कार करण्यासाठी दुप्पट आणि चौपट किंमत वसूल करताना अनेक जण दिसत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांचे अंतिम संस्कार कसे करावेत? याबद्दल कोणतीच मार्गदर्शक तत्त्वे सरकारकडून जाहीर करण्यात आलेले नाहीत. असं असताना सुद्धा अशी लुबाडणूक रोखण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही आहेत.

अंतिम संस्कारांमध्ये वाढ

दररोज कोरोना विषाणूमुळं शेकडो मृत्यू ओढावत आहेत. स्मशानात जिथं रोज १ आणि जास्तीजास्त चार ते पाच मृतदेहांवर अंतिम संस्कार शक्य होते. आता कोरोना काळात स्मशानांवर ताण वाढताना दिसतो आहे. मृतदेहांवर अंतिम संस्कार करता यावेत यासाठी नातेवाईकांना टोकन दिले जात आहेत. अंतिम संस्करांची संख्या वाढल्यामुळं लाकड आणि इतर सामग्रीची मागणी वाढली आहे. वाढलेल्या मागणीनंतर लगेचच यांचे दर वाढवण्यात आले आहेत. अंतिम संस्काराच्यावेळीसुद्धा लोकांची लुट सुरु आहे. ही भीषण परिस्थीती अनेक गरिब आणि आर्थिक दुर्बल घटकांवर ओढावली जात आहे.

इतकी वाढली आहे किंमत

अंतिम संस्कार करण्यासाठी लागणाऱ्या लाकडांचा दर आकाशला शिवतो आहे. एका मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी किमान चार क्विंटल लाकडं लागतात. मागच्या काही महिन्यांपूर्वी लाकडं ५०० रुपये क्विंटल होती आता याचे दर वाढून १८०० रुपये क्विंटल इतके पोहचले आहेत. शिवाय तुप, अर्थी बांधण्यासाठी बांबू, मध, कापड, फुलं, कापूर इत्याती सामानाचा दर वाढलाय. अर्थीसाठी लागणारे बांबू आधी १०० रुपयाला मिळायचे आता त्याचे दर ४०० रुपये झाले आहेत. मृदेह झाकण्यासाठी लागणारं कापड आधी १०० रुपयाला मिळायचं आता ते २०० रुपयांना मिळतं आहे. ५० ग्रॅम कापूर आधी ११० रुपयांना मिळायचा आता त्याची किंमत वाढून २५० रुपये झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला तुप आणि मधाचे ही दर वाढले आहेत.

महागाई रोखण्यासाठी सरकारनं उचलली नाहीत पावलं

कोरोना विषाणूमुळं मृतांच्या आकड्यात वाढ झाली आहे. मृतांचा आकडा नियंत्रणात आणण्यात सरकार सपशेल अपयशी झालेलं आहे. शिवाय वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यातही सरकार पावलं उचलाताना दिसतं नाही आहे. अंतिम संस्कारकरण्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तरी किमान सरकारनं मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत अशी मागणी लोक करत आहेत. मजबुरीचा फायदा घेऊन गरिब रुग्णांची होणारी लुट थांबावी अशी मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून होते आहे. महत्त्वाच्या सामानाची तस्करीही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. साठेबाजारी करुन तुडवड्याचं चित्र निर्माण केलं जातंय. यामुळं अधिक रक्कम प्रदान करुन लोक अंतिम संस्कारासाठी सामग्री खरेदी करत आहेत. सरकारनं वेळेत यात लक्ष घालून लोकांची लुट थांबवावी अशी मागणी लोक करत आहेत.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रतील गंभीर होत असलेल्या कुपोषणाच्या प्रश्नाचं उत्तर मध्यप्रदेशात शोधावं लागेल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button