कोरोनावरील लस आली; पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये लसीकरण

Corona Vaccine

नवी दिल्ली : संपूर्ण जगाचे कान जी बातमी ऐकण्यासाठी आसुसलेले होते. अखेर ती आनंदवार्ता आली आहे. करोनावरील (Corona) जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटिश सरकारनं फायझर-बायोएनटेक या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये (Britain )आता मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. करोनावरील लशीला  (Corona Vaccine)परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने करोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती.

ब्रिटन सरकारनं यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. इंग्लंडचे मंत्री नादिम जहावी यांचा हवाला देत एका माध्यमाने आपल्या वृत्तात म्हटले आहे, की सर्व काही ठरलेल्या योजनेप्रमाणे पार पडले आणि फायझ व बायोएनटेकने विकसित केलेल्या लशीला प्राधिकरणाची मान्यता मिळाली तर त्याच्या काही तासांतच लशीच्या वितरणाला आणि लसिकरणाला सुरुवात करण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER