कोरोनामुळे अर्थसंकल्प सादर करण्याची पारंपरिक पद्धत निघणार मोडीत

Anurag Thakur - Nirmala Sitharaman

दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पावर कोरोनामुळे (Corona) काय आर्थिक परिणाम दिसणार याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान, कोरोनामुळे हा अर्थसंकल्प सादर करण्याच्या स्वरूपावरही परिणाम झाला आहे. अर्थसंकल्प सादर करण्याची पारंपरिक पद्धत मोडीत निघणार आहे.

आज सकाळी पावणे नऊच्या सुमारस अर्थमंत्री सीतारामन अर्थ मंत्रलयामध्ये आल्यात व यंदाचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे पेपरलेस असेल अशी माहिती दिली. नेहमीप्रमाणे ‘खाता बही’ म्हणजेच कागदपत्त्रे असणारी बॅग आणण्याऐवजी यावेळी सीतारामन यांच्याकडे लॅपटॉप होता. लाल रंगाचे कव्हर असणाऱ्या या लॅपटॉपवर राजमुद्रा अंकित आहे.

सीतारामन आणि अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) हे अर्थ मंत्रालयामधून संसदेत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी करोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा पेपरलेस असणार आहे अशी माहिती दिली. या अर्थसंकल्पाची ‘डिजीटल कॉपी’ ऑनलाइन उपलब्ध असेल असे सांगण्यात आले.

सकाळी पावणे नऊच्या सुमारास निर्मला सितारामन अर्थमंत्रालयामध्ये पोहचल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत अनुराग ठाकूर आणि इतर अधिकारीही होते.

परंपरा

अर्थसंकल्प अर्थमंत्रालयाच्या प्रेसमध्ये छापले जातात. अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक आठवड्याआधी प्रेसमधील कर्मचारी मंत्रालयातच थांबून काम करतात. या काळात त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नसतो. यंदामात्र छापील अर्थसंकल्पाऐवजी अर्थसंकल्प डिजिटल माध्यमातून सादर केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER