कोरोना विषाणूची निर्मिती वुहानच्या प्रयोगशाळेतच झाली; डॉ. ली-मेंग यांचा दावा

अमेरिकेत घेतला आहे आश्रय

Dr. Li-Meng

बीजिंग : चीनच्या प्रसिद्ध विषाणुशास्त्रज्ञ डॉ. ली-मेंग (Dr. Li-Meng) यांनी दावा केला आहे की, कोरोनाचा विषाणू मानवनिर्मित असून त्याची निर्मिती वुहानच्या प्रयोगशाळेतच करण्यात आली. याबाबत मी लवकरच पुरावे सादर करणार आहे, असे त्या म्हणाल्या. डॉ. ली-मेंग प्रसिद्ध  विषाणुशास्त्रज्ञ  आहेत.

त्यांनी याबाबत चर्चा केल्यामुळे चीनचे सरकार त्यांना अटक करण्याच्या प्रयत्नात होते. त्या हाँगकाँगच्या बाहेर निसटल्या आणि त्यांनी अमेरिकेत आश्रय घेतला आहे. त्या म्हणाल्या की – कोरोनाची साथ पसरण्याच्या आधीच चीन सरकारला याबाबत माहिती मिळाली होती.

चीन सरकारने ती मिटवली. वुहानच्या बाजारातून कोरोना पसरल्याच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. मी याबाबत एक अहवाल प्रसिद्ध करणार असून कोरोनाचा विषाणू हा मानवनिर्मित असल्याचा पुरावा देणार आहे. कोरोनाच्या साथीबाबत वुहानचा मांस बाजार एखाद्या पडद्यासारखा वापरण्यात आला. या पडद्यामागे बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत. हा विषाणू नैसर्गिक नाही.

तो वुहानच्या प्रयोगशाळेतून बाहेर आला आहे. ‘जीनोम’चा सिक्वेन्स हा माणसाच्या बोटांच्या ठशासारखा आहे. या आधारावर त्याची ओळख पटवता येऊ शकते. भक्कम पुराव्याच्या आधारे हा विषाणूच्या प्रयोगशाळेतून आला असल्याचे सिद्ध करेन, असे मेंग म्हणाल्या. या विषाणूबाबतची माहिती चीनच्या सरकारी डेटाबेसमधून हटवण्यात आली आहे. सहकाऱ्यांना माझ्याविरोधात अफवा पसरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या काही मोजक्या  शास्त्रज्ञांपैकी मी एक आहे. चीन सरकार माझ्या जीवावर उठले आहे.  त्यामुळे मला हाँगकाँगमधून अमेरिकेत स्थलांतरित व्हावे लागले, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, चीनने कोरोनाचा विषाणू तयार केला, असा आरोप अमेरिकेने अनेक वेळा केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER