इस्पितळात दाखल होण्यासाठी कोरोना चाचणी ‘पॉझिटिव’ असणे गरजेचे नाही

does not have to be positive to be hospitalized - Maharashtra Today
  • केंद्र सरकारने जाहीर केले नवे उपचार धोरण

नवी दिल्ली : कोरोनावर उपचारांसाठी अधिसूचित केलेल्या कोणत्याही इस्पितळात किंवा आरोग्य केंद्रात दाखल करून घेण्यासाठी संबंधित रुग्णाकडे कोरोना चाचणीचा ‘पॉझिटिव’ अहवाल असणे गरजेचे नाही. संशयित कोरोना रुग्णालाही दाखल करून घेतले जाऊ शकते, असे नवे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

कोरोनावरील उपचार व रुग्णांना इस्पितळांत दाखल करून घेणे याबद्दल राज्यांच्या धोरणात भिन्नता आहे. त्यामुळे संपूर्ण देशासाठी असे एकच सामायिक व समान धोरण  केंद्र सरकारने  तयार करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिला होता. त्यानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालायने धोरण तयार करून ते सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना कळविले आहे. हे धोरण केंद्र व राज्य सरकारी इस्पितळांखेरीज सर्व महापालिका व खासगी रुग्णालयांनाही लागू आहे.

या धोरणातील ठळक मुद्दे असे आहेत:

  • ‘कोविड-१९’ उपचार केंद्रात दाखल करून घेण्यासाठी रुग्णाकडे कोरोना चाचणीचा ‘पॉझिटिव’ अहवाल असणे बंधनकारक नाही. संशयित कोरोना रुग्णांसही दाखल करून घ्यावे.
  • कोणत्याही रुग्णाला कोणत्याही कारणाने कोणतीही वैद्यकीय सेवा नाकारता येणार नाही. यात ऑक्सिजन व अत्यावश्यक औषधांचा समावेश असेल.
  • अन्य शहरातील रुग्णास इस्पितळात दाखल करणे नाकारता येणार नाही. रुग्ण त्याच शहरातील असल्याचा पुरावा मागता येणार नाही.
  • रुग्णाला इस्पितळात दाखल करून घेणे काटेकोरपणे गरजेनुसारच ठरविले जावे. ज्यांना रुग्णालयात ठेवण्याची गरज नाही अशा रुग्णांसाठी खाटा अडकून राहणार नाहीत, याची खात्री करावी.
  • रुग्णांना इस्पितळातून घरी पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने त्यासंबंधी ठरवून दिलेल्या धोरणानुसारच घेतला जावा.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button