कोरोना लसीच्या चाचणीसाठी विदर्भातून नेलेल्या माकडांना सोडले

Maharashtra Today

पुणे : कोरोना लसीची चाचणी ज्या लाल तोंडाच्या माकडांवर करण्यात आली होती त्यांना शनिवारी त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले.

या लाल तोंडाच्या माकडांचे आणि माणसांची जीन्स सारखे असल्याने औषधे – लसींचा मानवासाठी वापर सुरू करण्याआधी त्याची या माकडांवर चाचणी करतात. कोरोना लसींवरील संशोधनासाठी विदर्भाच्या जंगलातून लाल तोंडाच्या १२ माकडांना पकडून पुण्याला नेले होते. या माकडांवर पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत संशोधकानी कोरोना लसीच्या (monkeys taken from Vidarbha for vaccination) चाचण्या केल्या.

कोरोना विषाणू त्यांच्या शरीरात सोडल्यानंतर या माकडांमधील अॅण्टीबॉडीज कशा प्रतिसाद देतात, त्यांचे शरीर विषाणूला कसा प्रतिकार करते याचा सूक्ष्म बाबींचा संशोधकांनी अभ्यास केला. कोरोनावरील लस बाजारात उपलब्ध होण्यापूर्वी गेल्या सात महिन्यांपासून या माकडांवर प्रयोग सुरू होते. हे संशोधन यशस्वी झाल्यानंतर शनिवारी या माकडांना नागपुरातल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील चमूच्या मदतीने त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button