३० एप्रिलपर्यंत कोरोनाची साखळी तोडणे शक्य; डॉ. अविनाश सुपेंचा ‘हा’ उपाय

Maharashtra Today

मुंबई : देशभरात कोरोनाची दुसरी लाट पाय पसरत आहे. मात्र, कोरोनाची ही साखळी ३० एप्रिलपर्यंत तोडली जाऊ शकते (corona chain can be broken by April 30). त्यासाठी मिनी लॉकाडऊन किंवा कडक निर्बंध लावायला हवेत. तसेच रुग्ण सेवेवर ताण येत असेल, तर कठोर निर्बंध लावायलाच हवेत, असे राज्य कोव्हिड टास्क फोर्स चे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

डॉ. अविनाश सुपे (Avinash Supe) यांनी प्रसार माध्यमाला माहीती दिली आहे. आता कडक निर्बंध लावण्याची गरज आहे. रेल्वे प्रवासातही बदल करण्याची गरज आहे. कोरोनाची दुसरी लाट पाहता रुग्ण मृत्यू संख्या कमी आहे. पण मृत्यू दर वाढू शकतो. काही भागात मृत्यूचे प्रमाण अधिक का आहे? याचा अभ्यास करत आहोत, असे डॉ. सुपे यांनी सांगितले.

मृत्यू आणि लसचा काहीही संबंध नाही

प्रत्येकाने कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे. राज्यात ६५ लाख लोकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. लस घेताना ज्यांना व्याधी आहेत, त्यांनी त्या डॉक्टरांना सांगाव्यात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच लस घ्यावी. लस घेतल्यावर थोडा ताप, अ‍ॅलर्जी, हात दुखणे आदी प्रकार होतात. काहींचा मृत्यूही झाला आहे. पण त्याचा लसीशी काहीच संबंध नाही. लस सुरक्षित असून त्याचे दोन डोस घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

३०% लोकांना पुन्हा कोरोनाची शक्यता

आपल्या लस या कोरोनाच्या नव्या ट्रेंडसाठी उपयुक्त आहेत. लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असे नाही. ३० टक्के लोकांना लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याची शक्यता आहे. पण क्षमता कमी असते. गेल्यावर्षीचा कोरोनाचे ट्रेंड वेगळा होता. सध्या सौम्य लक्षणे असलेले रुग्ण अधिक आहेत. सध्याचा मृत्यूदर कमी आहे, ही चांगली बाब आहे. रुग्णांची संख्या वाढणे ही काळजीची बाब आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहीजे. प्रत्येकाने निर्बंधांचे पालन केले असते, तर ही वेळ आली नसती, सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवले पाहीजे, असे डॉ. सुपे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button