दैदिप्यमान कामामुळेच पुण्यातील मतदारसंघ निवडावा लागला; रुपाली चाकणकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Rupali Chankar - Chandrakant Patil - Maharashtra Today
Rupali Chankar - Chandrakant Patil - Maharashtra Today

पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना त्यांच्याच गावात ग्रामपंचायत निवडून आणता आला नाही. कोल्हापुरात महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली.

यासंदर्भात रुपाली चाकणकर यांनी टेक व्हिडीओ ट्विट केला. यात त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर आगपाखड केली आहे. चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी काहीही देणेघेणे नाही. ‘याला महागात पडेल’, ‘त्याला बघून घेऊ’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल करा’, ‘त्याला आत टाका’, अशा विषयांवर चंद्रकांनी पाटील यांनी पीएचडी केली आहे. आता ते M.Phil करत आहेत. छगन भुजबळ हे जामिनावर सुटले, असे वक्तव्य त्यांनी केले. चंद्रकांत पाटलांनी इतरांशी मग्रूरपणे बोलू नये, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा ते PWD अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी बाकी आहे. पण सध्याचा स्थितीत आरोग्य हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. यातून बाहेर आल्यावर सगळ्या चौकशी होईल, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button