वीजबिलावरून काँग्रेसने सरकारला शॉक द्यावा, काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

Ashish Deshmukh

नागपूर : वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस (Congress) नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने जनतेसोबत ठाम उभं राहावं. ठाकरे सरकारवर दबाव वाढवून या सरकारला शॉक द्यावा, अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वीजबिलाच्या मुद्द्यावरून काँग्रसे आणि राज्य सरकारमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

आशिष देशमुख ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. ते म्हणाले की, वीजबिल माफीवर ठाकरे सरकारचं घूमजाव म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यामुळे या मुद्द्यावर काँग्रेसने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) शॉक द्यायला हवा. वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून जनतेत मोठा संताप आहे. राज्यातील पाच कोटी ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे काँग्रेसने जनतेसोबत ठामपणे उभं राहावं. हे सरकार काँग्रेस आमदारांच्या भरवशावर सत्तेत आहे. त्यामुळे वीजबिल माफीसाठी काँग्रेसने या सरकारवर दबाव निर्माण करावा, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

राजीनामे खिशात ठेवा…

फडणवीस सरकारमध्ये असताना शिवसेनेच्या मंत्र्यांनी खिशामध्ये राजीनामे ठेवले होते. काँग्रेसनेही तेच करावं. जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खिशात राजीनामे ठेवावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER