काँग्रेसला अभिमान वाटला पाहिजे की मनमोहन सिंग सांगत होते ते मोदीला करावे लागते; मोदींचा टोमणा

PM Narendra Modi - Manmohan Singh

दिल्ली :- कृषी कायद्यांमधील मूळ मुद्द्याबद्दल कोणी बोलत नाही. घाई घाईत कायदा संमत करण्यात आला वगैरे विषयांवर बोलतात, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज नाव न घेता केंद्राच्या कृषी कायद्यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर टीका केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला राज्यसभेत उत्तर देताना मोदी यांनी काँग्रेसवरही (Congress) टीका केली. त्यांनी कृषी धोरणाबाबतचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचे वक्तव्य वाचून दाखवले. मनमोहन सिंग म्हणाले होते की, शेतकऱ्यांना त्याचा माल विकण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांना हा अधिकार मिळायला हवा. कृषी बाजारपेठा अधिक खुल्या करण्याची गरज आहे. कृषी बाजारपेठांना परावलंबी बनवणारी व्यवस्था बदलण्याचा आमचा उद्देश आहे. मोदी म्हणालेत, आम्ही हेच करतो आहे. काँग्रेस माझे ऐकणार नाही किमान मनमोहन सिंग यांचे तरी ऐकेल!

कृषी कायद्यासंदर्भातील भूमिका काँग्रेसने बदलली, यू-टर्न घेतला आहे, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणालेत, काँग्रेस आंदोलनामध्ये सहभागी होते आहे याबद्दल आक्षेप पण, अनेक वर्षांची यंत्रणा आता बदलण्याची गरज आहे हे ही काँग्रेसने शेतकऱ्यांना सांगावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER