काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड होणार डिजीटल

Congress

नवी दिल्ली :- बिहार विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दणकून पराभव झाल्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षाच्या निवडीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र कोरोनाच्या साथीचा विचार करून काँग्रेसचा आगामी अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. (Digital Voting in Congress, will rahul gandhi become new president?)

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी मंडळाने डिजीटल ‘आयडी कार्ड’ जारी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीने मतदार यादीही तयार करण्यास सुरुवात केली आहे. या ऑथेरिटीने राज्यांमधील सर्व युनिट्सकडून एआयसीसी प्रतिनिधींचे डिजीटल फोटो मागवले आहेत.

निवडणुकीत सुमारे दीड हजार प्रतिनिधी भाग घेणार आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनाच पुन्हा अध्यक्षपद देण्याची काँग्रेसकडून तयारी सुरू आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अन्य कुणी दावा केल्यास ही निवडणूक नाट्यमय वळण घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र, राहुल गांधी विजयी झाल्यास तेच पक्षाचे निर्विवाद नेते असून सर्वात लोकप्रिय नेते असल्यावरही शिक्कामोर्तब होणार आहे. परंतु, अध्यक्षपदाचे दावेदार वाढल्यास सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीला पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागेल. राहुल गांधी हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहणार की नाही, याबाबत काहीही कळले नाही.

आम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पूर्ण तयारी करत आहोत. दोन राज्य वगळता सर्व राज्यातील काँग्रेसच्या डेलिगेट्सची यादी मागवली आहे, असे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित एका काँग्रेस नेत्याने सांगितले. २०१७ मध्ये जशी यादी होती, तशीच यादी यावेळीही असणार आहे. ती अद्ययावत करण्यात येत आहे. यावेळी प्रत्येक डेलिगेट्सच्या आयडी कार्डमध्ये बार कोड असेल. त्याची सर्व माहिती असेल. हे व्होटर आयडी कार्ड लवकरच संबंधितांना देण्यात येणार आहेत.

नव्याने निवडून आलेल्या अध्यक्षाचा कार्यकाळ दोन वर्षाचा असेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले होते. म्हणून ही निवडणूक होत आहे.

ही बातमी पण वाचा : वीजबिलावरून काँग्रेसने सरकारला शॉक द्यावा, काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER