त्यावेळी काँग्रेस नेते सुटीवर होते; अमित शहांचा राहुल गांधींना टोमणा

Amit Shah - Rahul gandhi

कराइकल : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचार सुरू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुडुच्चेरीच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी कराइकल येथे एका सभेला संबोधित केले. अमित शहा (Amit Shah) यांनी काँग्रेसचे (Congress) नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका केली व पुदुच्चेरीमध्ये भाजपाच (BJP) सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी पुडुचेरी येथे राहुल गांधी यांनी आश्वासन दिले होते की, काँग्रेस सत्तेत आली तर मत्स्य मंत्रालय स्थापन करेल. यावरून शहा यांनी राहुल यांना टोमणा मारला – सन २०१९ लाच मत्स्य मंत्रालयाची स्थापन करण्यात आली आहे. तेव्हा काँग्रेस नेते सुटीवर होते!

खासदाराला माहिती नसणे दुर्दैव

अमित शहा म्हणालेत, ज्या पक्षाचा नेता गेले चार टर्म लोकसभेत खासदार आहे, त्यांना दोन वर्षांपूर्वीपासून देशात मत्स्य मंत्रालयाचा कारभार सुरू झाला आहे, याची कल्पनाही असू नये, याचे आश्चर्य वाटते. असा पक्ष आणि त्याचे नेते पुदुच्चेरीचे कल्याण कसे करणार? पदुच्चेरी विधानसभेसाठी ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER