
मुंबई : औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामकरण हा मुद्दा रोज तापतो आहे. आज मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवर औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख झाल्यानंतर काँग्रेसने यावर नापसंती व्यक्त केली. काँग्रेस या मद्द्यावर फक्त नाराजीपुरतीच मर्यादित राहते की कारवाईचे पाऊल उचलते याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी याबाबत ट्विट केले, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते आहे. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.
ही बातमी पण वाचा : प्रदेशाध्यक्षपदी थोरातच हवेत, कॉंग्रेस मंत्र्यांनी प्रभारींसमोर घेतली भूमिका ?
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असे थोरात यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 6, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला