सडक्या प्रवृत्तींनमुळे काँग्रेस रसातळाला, मात्र ही समाधानाची बाब, भाजपची विखारी टीका

Maharashtra Today

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जितिन प्रसाद (Jitin Prasad)यांनी बुधवारी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचे कमळ आपल्या हाती घेतले. रेल्वेमंत्री पियूष गोयल, भाजप खासदार अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भाजप (BJP)मुख्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींचे जे ४ नेते शिलेदार म्ह्णून ओळखले जायचे त्यातील आतापर्यंत दोघांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. या चार शिलेदारांमध्ये जितिन प्रसाद यांचाही समावेश होता.

जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर आता राजस्थानमधील काँग्रेसचे बडे नेते सचिन पायलट आणि मिलिंद देवरा हे ही नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशातच मिलिंद देवरांनी गुजरात सरकारच्या कामाचे कौतुक केल्याने टेन्शन वाढले आहे. करोनाच्या संकटामुळे गजरातमध्ये हॉटेल उद्योग, रेस्टॉरंट, रिसॉर्ट आणि वॉटर पार्क पूर्णपणे बंद आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान पाहता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी त्यांचा एक वर्षाचा मालमत्ता कर आणि वीज बिल माफ केले आहे. यावरुन मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्वीट करत गुजरात सरकारचे कौतुक केले आहे. इतर राज्यांनी अनुकरण करावे, असे स्वागतार्ह पाउल आहे. देशातील पर्यटन क्षेत्रातील नोकऱ्यांचे आणखी नुकसान रोखण्यासाठी सर्व राज्यांनी तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे, असं मिलिंद देवरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आणि यावरुन भाजपने काँग्रेसवर विखारी टीका केली आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे, मिलिंद देवरांनी गुजरात मॉडेलचे कौतुक केल्याने काँग्रेसला टेन्शन आले आहे. विरोधकांच्या कौतुकास्पद कामगिरीची प्रशंसा करणे काँग्रेसमध्ये सध्या गुन्हा ठरत आहे. अशा सडक्या प्रवृत्तीमुळे काँग्रेस रसातळाला जाते आहे, ही मात्र समाधानाची बाब आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button