प्रजासत्ताक दिनाची शुभेच्छा देतानाही काँग्रेसला आवरता आली नाही मोदी आणि संघाच्या द्वेषाची उबळ

Sachin Sawant

मुंबई : “प्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चालली असून गणतंत्र हे संघतंत्र होऊ नये याकरिता लढणे हाच संकल्प ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने योग्य आहे. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो हे म्हणताना तो चिरायू राहावा ही जबाबदारी आपली आहे हे लक्षात ठेवा! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” अशा शब्दांमध्ये मोदींच्या नावाने खडे फोडत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

“राज्य सरकारने ९९ नावांची शिफारस पद्म पुरस्कारांसाठी केली त्यामध्ये केवळ पद्मभूषणसाठी सिंधुताई सपकाळ यांचे दिलेले नाव मोदी सरकारने लक्षात घेतले. त्यातही सिंधुताईंना पद्मश्री देण्यात आला. यामध्ये भाजपाशी व संघाशी जवळीक हाही निकष होता. युपीएलचे अध्यक्ष त्याच प्रकारे आले असे दिसते.” असा आरोप सावंत यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER