मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘गजनी’तील आमिर खानसारखी – माजी कृषिमंत्री

Anil Bonde - Ghajini - Uddhav Thackeray

उस्मानाबाद : मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘गजनी’ सिनेमातील विस्मरण होणाऱ्या आमिर खानच्या (Aamir Khan) व्यक्तिरेखेसारखी झाली आहे अशी टीका माजी कृषीमंत्री आणि भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे. एवढेच नाही तर, मुख्यमंत्र्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासठी आयुष मंत्रालयाने त्यांना च्यवनप्राश व आयुर्वेदिक औषध पाठवावे, असा सल्लाही अनिल बोंडेंनी दिला.

सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही अनिल बोंडे यांनी केली आहे.

ते म्हणाले, मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोराडवाहूला 25 हजार आणि बागायतीला हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊ अशी मागणी केली होती, याचा त्यांना विसर पडला. सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. सरकार मुर्दाड झालं आहे. सरकारने कर्ज काढावे, स्वतः गहाण राहावं, पण शेतकऱ्यांना मदत करावी” अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली.

संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि बंगालच्या उपसागरातील पट्ट्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अद्याप पंचनामे झालेले नाहीत. पंचनामे झाले तरी आम्ही मदत देऊ शकत नाही, असं कृषिमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन हातचं गेलं, तुरीमध्ये पाणी आहे, कापसाची पात्या-बोंडं गळून पडली, कांद्याचं अतोनात नुकसान झालं आहे. सरकारने पंचनाम्याच्या भानगडीत पडण्याऐवजी जिथे पावसामुळे नुकसान झालं, तिथे सरसकट नुकसान भरपाई द्यावी. मागच्या वेळी आम्ही जो जीआर काढला, एनडीआरएफ-एसडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट नुकसान भरपाई द्यावी” अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली.

बोंडे म्हणाले, सध्या शेतकऱ्यांचे कुटुंब वाऱ्यावर आहे. मुख्यमंत्री व सत्ताधारी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर अद्याप आलेले नाहीत. कारण सगळे जण आपल्या कुटुंबासोबत आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हेच त्यांच्यासाठी मोठं आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबाची त्यांना काळजी नाही.

उद्धव ठाकरे यांनी मंत्री व आमदारांना आपल्या कुटुंबासोबत राहावं आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळा असे आदेश दिले आहेत. शेतकरी यांना माफ करणार नाहीत, फटके मारतील” अशी टीकाही अनिल बोंडेंनी केली. ‘गजनी’ सिनेमात आमिर खानसाने साकारलेल्या संजय सिंघानिया या व्यक्तिरेखेला विस्मरणाचा आजार जडला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER