
आपण काल “संवादाची (Communication)ऐशीतैशी “या लेखामध्ये सगळ्या व्यक्तींचे स्वतःचे भावविश्व असते. त्यांच्या त्यांच्या भूमिका आणि त्यांची कर्तव्य असतात. आणि त्यातून संवादाचे महत्त्व पटूनही अडथळे कसे येतात? हे बघितले. तसेही फार पूर्वीपासून सगळ्या संतांनी संवादाचे महत्त्व सांगितलेच आहे. व्यवहारात सर्वत्र संवाद अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. अध्यात्मात सुद्धा भगवंताशी अनुसंधान जोडण्यासाठी वेगळ्या प्रकारचा संवाद असतो. तर अतिशय योग्य जिथे धागे, सुर जुळतात तेथे तर “शब्देविण संवादू ” महत्त्वाचा ठरतो.
आज आपण अशा एका संवादाच्या महत्त्वपूर्ण पूर्ण भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत की बरेचदा या भूमिकांमध्ये जेव्हा संवाद होतो, तेव्हा बऱ्याच प्रमाणात त्याचे वादविवादात रूपांतर होण्याची शक्यता खूप असते .कारण आयुष्याच्या वेगवेगळ्या लेव्हलवर उभा राहून या व्यक्ती संवाद साधत असतात. अशा कुठल्या आयुष्याच्या टप्प्याविषयी बोलत असेंन बरं मी ? अगदी बरोबर ! पालक आणि कुमारावस्था किंवा पौगढावस्थेतील मुलांबरोबर पालकांचा होणारा संवाद हा बरेच वेळा वाद उत्पन्न करणारा होतो. खरे तर कुठल्याही पिढ्यांमध्ये नात्यांचा संवाद हा पायाच असतो. म्हणूनच पालक म्हणून हा पाया भक्कम करणे खूप गरजेचं असतं. बरेचदा शब्देविन संवादू होत असला तरीही बरेचदा याविषयी या ह्रदयाचे,त्या हृदयी, जाणारी वाट म्हणून संवादाचा उपयोग केला जातो .आणि त्यामुळे समोरच्यापर्यंत जर पोचायचे असेल तर त्या व्यक्तीचे भावविश्व जाणून घेणे अतिशय आवश्यक असते. हे प्रत्येकाच्याच बाबतीत वेगवेगळे असते. वयस्क लोकांच्या भावनिक गरजा, अपेक्षा, या जशा भिन्न असतात.
तशाच या कुमार अवस्थेतील मुलांच्या ही खूप वेगळ्या असतात. आणि त्यांना जाणून घेणं हे खूप आवश्यक असतं. त्यावेळेला त्यांच्या शरीरात होणारे अंतर्स्त्रावी ग्रंथी मधील बदल आणि त्याचा मानसिकतेवर होणारा परिणाम एवढाशरीरात झालेल्या बदलामुळे, भावनिक अवस्था खूप दोलायमान झालेली असते. अशा वेळेला खूप आंतरिक संघर्ष मनामध्ये चाललेला असतो मी नेमका कोण ? असा स्वतःचा शोध घेणेही सुरू असतो. मी नेमकी मोठा की मोठी झाले की नाही ? कधी पालक मोठा समजतात तर कधी लहान ! त्या वयाच्या मुलां मुलींना मात्र वाटतं असत की आम्ही आता मोठे झाले आहोत. स्वतःच्या या हक्काची त्यांना जाणीव होते स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते .आता मला बरोबरीने सगळीकडे स्थान मिळायला पाहिजे असं वाटायला लागतं. खूप मोठे ही नाही आणि खूप लहान ही नाही अशी काहीतरी विचित्र असते.
अशा विचित्र मानसिकतेत असलेल्या आपल्या मुलांना समजून घेण्याची जबाबदारी नक्कीच पालकांची असते. अशावेळी त्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत हे बघणं गरजेचं असतं.
१) बरोबरीचं नातं . आपल्याकडे म्हण आहे की ज्या वेळेला बापाची चप्पल आणि मुलाची चप्पल एकसारखे असते तेव्हापासून मूल मोठं झालं असं समजावं .अशा वेळेला त्यांना सगळीकडे बरोबर हवी असते .का नाही, मलाच का नाही ?तुमचं चालतं माझ का नाही ? तुम्ही अमुक एक बोलला तर चालतं मी का नाही ? अशी सगळ्या प्राप्तीत बरोबर हवी असते त्यांना होत असलेली स्वतःच्या हक्कांची जाणीव. अशावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की काही वर्ष ही लढाई चालते नंतर मुलं आपोआपच मॅचूअर होतात. आणि योग्य त्या प्रकारे वागायला लागतात.
२) न्याय वागणुक ! तुला फरक नसतो. आता तुम्ही म्हणाल की सगळ्या वेळी कायम गुडीगुडी बोलायचं का ? तर तसं नाही पण आपण बोलतो ,वागतो त्यामागचा विचार, कारण मिमांसा आणि तर्कशुद्ध पद्धतीने आपल्याला मांडता यायला पाहिजे, समजून घेता आली पाहिजे. आपली कृतीच मुळे आणि विचार देखील स्पष्ट हवेत. नाहीतर मग हे काम दादाला का नाही सांगत मलाच का ? आणि दादाला तेवढी उशिरा यायची सवलत आणि मला का नाही! असे वादंग होऊ शकतात.
३)खुली दाद .म्हणजे कोणत्याही केलेल्या अतिशय छोट्या छोट्या कृतीला appreciate केलं दाद दिली कौतुक केलं दखल घेतली गेली तर ती नात्यांमध्ये खूप चांगला बदल घडवून आणते आणि मुलांचाही आत्मविश्वास वाढतो .त्याचप्रमाणे एखादा चांगला छोटा बदल तरीही त्याचं उल्लेख करायला हवा. उदा. काल चिंटू ने मनाने आपले सकाळचे लिंबू पाणी गरम करून वेळेवर घेतले. माझ्या ते लक्षात आल्याबरोबर मी त्याला तशी दाद दिली. गंमत अशी झाली की आजीने त्याला आठवण दिलेली होती आणि त्यामुळे तो ते गरम करून पीत होता. पण ही गोष्ट दुय्यम. परंतु मनाने पटकन सकाळी लवकर लिंबू पाणी प्यायची सवय लागणे हे चांगले एवढी नोंद चिंटूच्या मत मनात नक्कीच झाली असणार.
४) निरपेक्ष प्रेम आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे तू जसा /जशी आहे तसा किंवा तशी मला आवडते. हे कायमस्वरूपी आपल्या बोलण्यातून फेशियल एक्स्प्रेशन, देहबोलीतून जास्त व्हायला पाहिजे. जेव्हा एखाद् मुल म्हणत असेल की त्यांना मी आवडत नाही. तेव्हा पालकांनी स्वतःचं वागणं तपासायला पाहिजे.
५) जवळीक आणि सुरक्षितता या भावना मुलांमध्ये असतील तर तेवढा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होईल असा संवाद आपला व्हायला पाहिजे. म्हणजे हा मुल आपल्याला काही एक सांगत असतं, तेव्हा आपण ऐकलंही पाहिजे, आपण ऐकतो आहे हे त्याला जाणवायला ही पाहिजे, आणि बरेचदा आपण जे काय पाहतो, ऐकतो ,जगतो, ते त्यांना शेअर ही केले पाहिजे.
या वयाच्या मुलांना या गोष्टींची अत्यंत जास्त गरज असते. संवाद म्हणजे काय तर डायलॉग ! म्हणजे दोन्ही बाजूने होणारा तो संवाद ! आम्ही बरेच दा पालकांना विचारतो, की तुम्ही आणि तुमची मुलगी याच्यात संवाद आहे का? तुम्ही बोलता का तुमच्या मुलांशी ? त्यावेळी काही पालक म्हणतात, “हो ! आम्ही फिरायला गेलो की मी बोलतो न त्याच्याशी अर्धा तास !”किंवा बरेचदा एखादी आई म्हणते,”मी आपली सारखी त्यांच्याशी बोलत असते, मुलांना मात्र काही बोलायचं न.”असे एकतर्फी संवाद का होतात ? असा पण कधी तपासून बघितला आहे. मग हे तपासून बघायला हवं की आपण जेव्हा जातच बोलत असतो तेव्हा हा किंवा आई जेव्हा सतत बोलते आणि मुले फक्त ऐकतात किंवा दुसऱ्या कानाने सोडून देतात. तेव्हा अस तर नाही होत ? पालक बोलताना त्यात सतत सल्ला, सूचना ,उपदेश आणि मुलांबाबत च्या तक्रारी एवढेच असतं का ?
दुसरी गोष्ट अशी तपासावी लागेल की फास्ट लाइफस्टाइल झालेली आहे की क्वालिटी टाईम काढायचा तर कशी आतून पूर्वी यायला पाहिजे. त्यावेळा नेहमीच्या कळायला पाहिजे परफेक्ट instinct ती असायला पाहिजे
हा आदर्श संवाद कसा असेल तर दोन व्यक्तींनी केलेली चार गोष्टींची देवाण-घेवाण ! या चार गोष्टी कोणत्या ? तर कल्पना, विचार ,भावना, आणि अनुभवांची देवाणघेवाण !. याशिवाय संवादात, हेतूंची स्पष्टता आणि शैली या गोष्टीचा परिणाम होत असतो. बरेचदा हेतू स्पष्ट असतो, पण पण शैली फार चुकीचे असते. काही वेळेला हेतूंची स्पष्टता ही नसते आणि शैलीत सुद्धा चुकीचे असते, बरेचदा शैली ठीक आहे परंतु त्यातून नेमकं काय म्हणायचं आहे याचा अर्थ बोध होत नाहीये असंही होऊ शकतं. संभाषण नेमकं काय चाललंय याविषयी मुलांच्या मनात कन्फ्युजन निर्माण होतो. म्हणूनच त्यांच्याशी बोलताना आपल्याला स्वतःला आपल्या हेतून बद्दल स्पष्टता हवी.
आणि दुसरी गोष्ट आपला हेतू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आपली शैली ही व्यवस्थित हवी. कुमारवयीन मुलांना बरोबरच्या चांगल्या संवादासाठी काही गोष्टी.
कुठेही टोमणे मारणे, कडवट भाषा, उडवून लावणे किंवा पूर्ण अबोला अजिबात नको. नाहीतर मुलांमध्ये खूप भावनिक निराशा येते.
नेहमी win-win स्थिती यायला पाहिजे. नातं जपताना एकाचा जय आणि एकाचा पराजय असावाच असे गरजेचे नाही. आग्रही ठाम पण सहानुभूतीपूर्वक शैलीचा वापर करावा.
ही बातमी पण वाचा : संवादाची ऐशी तैशी
मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला