सुडाच्या राजकारणात सामान्य मरतो; केदार शिंदेंचा संताप

Kangana Ranaut - Kedar Shinde

मुंबई : अभिनेत्री कंगनाने (Kangana Ranaut) शिवसेनेच्या (Shiv Sena) विरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे चिडलेल्या मुंबईच्या (Mumbai) मनपाने तिचे ऑफिस अनधिकृत म्हणून तोडले. या कारवाईबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) म्हणाले – सुडाच्या राजकारणात सामान्य मरतो.

केदार शिंदेंनी ट्विट केले – ‘जे घडलं ते अत्यंत चुकीचे ! निंदनीय! या मुंबईमध्ये मी जन्मलो. ही आडवीतिडवी वाढली ती पूर्ण अधिकृत आहे? वर्षानुवर्षे अडचणी जाणवतात. त्याला जबाबदार कोण? मुंबई महापालिकेने मनावर घेतले असते तर, याआधीच असंख्य ठिकाणी जेसीबी चालले असते. राजकारण करा, पण ते कोणत्याही बाजूने सुडाचे नको. यात सामान्य मरतो.’

केदार शिंदेंनी मुंबई महापालिकेला टॅग करत ट्विट केले, ‘बांधकाम अनधिकृत असेल तर पाडायला हवेच. पण ते बांधकाम बांधताना संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना समजले नाही? मग तेही तितकेच दोषी आहेत. त्यांना तर निलंबित करायला हवे ना? परवानगी दिलीच कशी?’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER