
पुणे : पुणेकरांकडून वसूल केलेल्या पैशातून काही नेत्यांनी स्वतःसह पक्षाचीही प्रसिद्धी केली. सिंहगड रस्त्यावर आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांच्या फंडातून दोन बस स्टॉप तयार करण्यात आले आहेत. या बस स्टाॅपला भाजपच्या झेंड्याचा (BJP Flag ) रंग दिला आहे. मनसेचे (MNS) रवी सहाणे यांनी सांगितले की, शहरात विविध गणेश मंडळे, नागरिक कट्टेदेखील सोडले नाही. पक्षाची जाहिरात नागरिकांच्या पैशातून होत आहे. पण नागरिकांना उत्तम रस्ते ,पुरेसे पाणी व उत्तम आरोग्य मिळत नसल्याची टीका मनसेकडून केली आहे.
वृध्द, अपंग, महिला आदी प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागतात, प्रवाशांची सोय व्हावी, या उद्देशाने हे बस स्टॉप तयार करण्यात आले, असे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला