थंडीचा जोर वाढणार

Cold Weather

पुणे : सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये गारठा वाढल्याने याचा राज्यातील हवामानावर परिणाम होणार आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. विशेषतः पुणे, मुंबई आसपासच्या परिसरात तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.थंडीसाठी वातावरण पोषक असल्याने अजून दोन दिवस राज्यात गारठा कायम राहणार आहे. विदर्भाच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातील राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता बहुतेक ठिकाणी आकाश निरभ्र असून थंडीचा पारा कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

उत्तर भारतात काही ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान , हरियाणा या राज्यांमध्ये तापमानाचा पारा खाली आला आहे. यातच महाराष्ट्रात सध्या हवामान कोरडे असून, पुढील एक आठवडा ते कोरडेच राहाणार असल्याचे हवामान शास्त्र विभागाच्या संकेत स्थळावरुन स्पष्ट होते. याचाच परिणाम राज्यातील अनेक भागात झाला असून, थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER