नाणे लिलावात खणखणीत वाजले; १३८ कोटी रुपयांना विकले गेले!

Coins - Maharashtra Today

नवी दिल्ली : अमेरिकेत आयोजित दुर्मिळ नाण्यांच्या लिलावात एक नाणे १३८ कोटी रुपयांत विकले गेले. हे नाणे १९३३ या वर्षातील आहे. त्यावेळी त्याची चलनातील किंमत होती २० डॉलर. ते पूर्ण सोन्याचे आहे. त्याला ‘डबल ईगल नाणे’ म्हणतात, ज्यामुळे त्याचे मूल्य लक्षणीयरीत्या वाढ होते.

हे नाणे ७३ ते १०० कोटी रुपयांच्या दरम्यान विकले जाईल, असा अंदाज होता; पण तो मोठ्या प्रमाणात खोटा ठरला. लिलावात त्याची बोली सतत वाढत गेली आणि ते १३८ कोटी रुपयांना विकले गेले!

या नाण्याच्या एका बाजूला गरुडाचे तर दुसऱ्या बाजूला Liberty ची आकृती आहे. तज्ज्ञांच्या मते हे नाणे अमेरिकेत प्रचलित असणाऱ्या सोन्याच्या नाण्यांमधील शेवटचे आहे. त्यामुळे याचे मूल्य वाढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे नाणे शू डिझाईनर आणि कलेक्टर स्टुअर्ट विट्जमॅन यांच्याकडे होते. त्यांनी २००२ मध्ये हे नाणे सुमारे ५५ कोटींना विकत घेतले होते. यासोबतच त्याच्याकडे तिकीटही होते, जे त्यांनी ६० कोटी रुपयांना विकले होते. हे तिकीट दक्षिण अमेरिकन देशाने छापलेले एकमेव मुद्रांक होते. स्टुअर्ट विट्जमॅन यांना लहानपणापासूनच नाणी आणि शिक्के ठेवण्याची आवड होती. त्यांच्या याच आवडीमुळे आज ते करोडपती झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button