कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री एक दोन दिवसात निर्णय घेणार, वडेट्टीवारांचे संकेत

Vijay Wadettiwar - CM Uddhav Thackeray

मुंबई :- सध्या राज्यात कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी १ मे २०२१ पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, तरीही कोरोनाचे गांभीर्य जनतेमध्ये नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा विचार असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेतील, असे मोठे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले आहे. आज माध्यमांशी संवादसाधताना त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी ते म्हणाले की, सध्या ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र लोकांमधून १०० टक्के सर्व बंदची मागणी होत आहे. यावर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येतील. कडक लाॅकडाऊनबाबत अजून दोन दिवसात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे म्हणत त्यांनी राज्यात कडक लॉकडाऊनचे संकेत दिले.

करोनाची दुसरी लाट सौम्य असेल असा अंदाज होता पण हा अंदाज चूकला. राज्यातील स्थिती आज गंभीर आहे. त्यामुळेच कडक लॉकडाऊनची गरज असून व्यापारी व छोट्या दुकानदारांचाही विरोध आता मावळत चालला आहे. भारतात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाउनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत ६ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातही ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाचा आकडा वाढत असल्याने ठाकरे सरकार कडक लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी पण वाचा : उद्यापासून किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू; सरकारचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button