मुख्यमंत्र्यांची कोरोनाशी चर्चा बाकी, नंतर निर्णय घेतील, चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Uddhav Thackeray-Chandrakant Patil

कोल्हापूर :- सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने निश्चितच चिंता आहे. मात्र लॉकडाऊन आणि राज्यातील जनतेला द्यावयाच्या पॅकेजबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आतापर्यंत कुठलंही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टोला लगावला. मुख्यमंत्र्यांची कोरोनाशी चर्चा करायची राहिली असेल. त्यानंतर ते निर्णय घेतील, अशा मिस्कील शब्दात चंद्रकातंत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मला कुणी तरी एक मेसेज पाठवला. सगळ्यांशी चर्चा झालेली आहे. आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी आहे. त्यानंतर निर्णय घोषित केला जाईल, असं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं, असा टोला पाटील यांनी लगावला.

यावेळी त्यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची केलेल्या बदलीवरून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला लगावला. शुक्ला यांच्या बदलीवर संशय व्यक्त करण्या इतका मी तज्ज्ञ नाही. ही रुटीन बदली आहे. तर तीन महिन्यांपूर्वीच व्हायला हवी होती. आपल्याकडे खूप डोकं लावणारे लोकं आहेत. बदली काय असते हे त्यांना सांगावं का?, असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button