हे उद्धव ठाकरे आहेत, पुजा चव्हाण प्रकरणात ते कुणालाही पाठीशी घालणार नाही – संजय राऊत

Sanjay Raut-Pooja Chavan-CM Thackeray

नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत. ते पुजा चव्हाण प्रकरणात कोणाचीही गय करणार नाही. कालच त्यांनी अधिका-यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चौकशीतून सत्य समोर येईल. मुख्यमंत्री कुणालाही पाठीशी घालणार नाही असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी नाशिकमध्ये माध्यमांना सांगितलं.

संजय राऊत पुढे म्हणाले, राजकारणात एखाद्याचा बळी घ्यायचा, चारित्र्यहनन करायचे, असे प्रकार वाढले आहेत. राठोड अनेक वर्ष राजकारणात आहेत, राठोड विदर्भात शिवसेनेचा आधारस्तंभ आहेत, असंही राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, पुजा चव्हाण प्रकरणी भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आह. तसेच, मुख्यमंत्र्यांनी व्हायरल सर्व क्लिप ऐकाव्या म्हणजे त्यांना कळेल की कोणाचे आयुष्य उद्धवस्त झाले अशा शब्दांत प्रहार केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हमाले होते –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवडी ते न्हावा शेवा ट्रान्सहर्बर प्रकल्पाच्या कामाच्या पाहणीसाठी आले होते. यावेळी त्यांना पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करणार का? “या संदर्भात व्यवस्थित चौकशी केली जाईल… जे सत्य आहे ते बाहेर येईलच…यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई होईल. या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही दिवस काही महिने… एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय…असाही प्रयत्न होता कमा नये… आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये… या मध्ये जे सत्य असेल ते संपूर्ण चौकशी करून जनते समोर येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER