कोसळलेल्या इमारतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, परिस्थितीचा घेतला आढावा

CM Uddhav Thackeray On Building Collapesd

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील फोर्ट परिसरात भानुशाली या रहिवाशी इमारतीचा एक भाग कोसळल्याची घटना घडली. या इमारतीचा ४० टक्के भाग संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास कोसळला. त्या ठिकाणी जो ढिगारा झाला त्या ढिगाऱ्याखालून आत्तापर्यंत सहाजणांना बाहेर काढण्यात आलं आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चारजण जखमी आहेत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास २० जण अडकल्याची भीती आहे .

या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथकं तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, (Kishori Pednekar) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,(Jitendra Awhad) शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या दुर्घटनेला इमारतीचा मालक दोषी असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. धोकादायक इमारतींकडे महापालिका दुर्लक्ष करत नाही. मात्र, आम्ही लोकांना खेचून घरातून बाहेर काढू शकत नाहीत. त्यामुळे मालकांची किंवा प्राधिकरणाची ती जबाबदारी असते. मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीचा एक मालक आहे. त्याला महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. पण इमारतीचा मालक आणि रहिवासी यांच्यात याविषयी चर्चा झालेली नसेल. मालकाने याबाबत रहिवाशांना माहिती द्यायला हवी होती. इमारतीचं काम करायला हवं होतं. मात्र, मालकाने त्याकडे दुर्लक्ष केले, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER