भररस्त्यावर तरुणाला कानशिलात मारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यानी हटवले

CM Bhupesh Baghel

सुरजपूर :- कोरोनाचा लॉकडाऊनच्या काळात खोटे कारण सांगून रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणाच्या कानशिलात जिल्हाधिकाऱ्यांनी लगावली. शनिवारी संध्याकाळपासून याचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होता. याची दखल घेऊन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना तातडीने त्यांच्या पदावरून हटवले. आयएएस अधिकारी संघटनेने जिल्हाधिकारी रणबीर शर्मा (Ranbir Sharma) यांच्या वर्तनाची भर्त्सना केली आहे.

घटना

सूजलपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा लॉकडाऊन आहे. मात्र, अनेकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. एक तरूण बाईकवरून जात असताना जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी त्याला हटकल. तरुणाने आधी लस घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले. पण त्याच्याकडची पावती लसीकरणाची नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने वृद्ध आजीला भेटायला जात असल्याचे सांगितले. त्याच्या खोटेबोलण्याने संतप्त झालेल्या रणबीर शर्मा यांनी त्याचा फोन जमिनीवर आपटून फोडला आणि त्याच्या कानशिलात लगावली. सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याला मारण्यास सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची दखल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी घेतली. “सोशल मीडियावर सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांच्याकडून एका तरुणाशी गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही एक दु:खद आणि निंदनीय घटना आहे. छत्तीसगडमध्ये असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. रणबीर शर्मा यांना तातडीने हटवण्याचे निर्देश देण्या आले आहेत”, असे ट्वीट मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले.

माफीनामा
दरम्यान, रणबीर शर्मा यांनी घटनेची माहिती देतांना माफी मागितली. ते म्हणालेत, जेव्हा मी त्यांना थांबवले, तेव्हा तो म्हणाला की मी लस घेण्यासाठी जातो आहे. पावती दाखवली ती लसीकरणाची नव्हती. नंतर तो म्हणाला की आजीला पाहायला जातो आहे. त्यांने गैरवर्तन केले आणि मी रागात त्याला कानशिलात लगावली. या वर्तनासाठी माफी मागतो.

बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button