दुजाभाव व प्रभावाखाली काम करण्याचा कळस; चंद्रकांतदादांची रामराजेवर टीका

भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल; विप उपसभापती निवडणुकीबाबत नाराजी

chandrakant patil & Ramraj

मुंबई : कोरोनाची (Corona) साथ आणि सभागृहात आमदारांची पूर्ण उपस्थिती नसताना विधान परिषदेच्या उपसभातींची निवडणूक घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने नाराजी व्यक्त केली. याबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraj Nibalkar) यांना लिहिलेल्या पत्रात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की – दुजाभाव व प्रभावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला असून भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल असं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच भाजपाविरोधात कितीही षडयंत्र रचलीत तरी तुम्ही त्यात यशस्वी होणार नाही.

या निवडणुकीत नीलम गोऱ्हे यांची एकमताने उपसभापतीपदी निवड करण्यात आली. महाविकास आघाडीकडून उपसभापतीपदासाठी नीलम गोऱ्हे तर भाजपाकडून भाई गिरकर यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. नीलम गोऱ्हे यांची एकमतानं निवड करण्यात आली. निवडणुकीच्या वेळी भाजपाने सभात्याग केला.

चंद्रकांत पाटील यांचे पत्र

चार वर्षांपूर्वी सभापती म्हणून निवडताना आयुष्यात राष्ट्रवादीला कधीही न केलेले मतदान आम्ही केले. परंतु आमचे सरकार असतानाही तुम्ही कधीही आम्हाला सहकार्य केले नव्हते. आज तर दुजाभावाचा, दबावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला आहे.

करोनामध्ये उपसभापतीची निवडणूक? भाजपाचे तीन सदस्य कोविड बाधित तरीही निवडणूक? सभागृहात ७८ च्या ऐवजी ६० सदस्य उपस्थित तरीही निवडणूक? कोर्टात केस पेंडिंग, तरीही निवडणूक? आश्चर्य आहे. एक निस्पृह व्यक्तीमत्व म्हणून आपल्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर आज निश्चितच कमी झाला आहे. असो राजकारणात हे चालायचेच.

निवडणुकीपूर्वी भाजपाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबतचा निकाल गुरूवारी न्यायालय देणार असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हटले. आवाजी मतदान घेण्यात आले आणि नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी नियुक्ती करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER