चिपांझीने पोते फाडून तयार केला ड्रेस!

चिपांझीने पोते फाडून तयार केला ड्रेस

लंडन : चिपांझी (Chimpanzee) माकडे बुद्धीवान असतात आणि त्यांची बरीचशी वर्तणूक माणसासारखीच असते. येथील प्राणीसंग्रहालयातील सहा चिपांझीना कॉफीच्या बियांची रिकामी झालेली पोती देण्यात आली. ते या पोत्यांचा वापर कसा करतात याचे निरीक्षण करण्यात आले. १६ वर्षांच्या गंबीरा या माकडीणीने चमत्कार करून दाखविला. पोत्याचे दोन्ही कोपरे फाडून त्यातून आधी हात बाहेर काढले. नंतर वरची बाजू फाडून पोते डोक्यातून (ड्रेससारखे) बाहेर काढले! प्राणीसंग्रहालयात आलेले प्रेक्षक हे पाहात होते; त्यांनी तिचे फोटो काढायला सुरवात केली तेव्हा तिने फोटोसाठी मस्त पोजही दिल्या!

या प्रयोगावर देखरेख करणारे नील बेमेंट म्हणाले की चिपांझींना आम्ही पोती दिली मात्र गंबीरानेच त्याचा असा उपयोग केला. यावरून तिची जिज्ञासा आणि बुद्धीमत्ता कळते. गंबीरा ‘बोर्नियन’ प्रजातीची चिपांझी असून ही जात आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगभरात या जातीचे केवळ ५० हजार चिपांझी शिल्लक राहिले आहेत. जंगलतोड, पाम प्लांटेशन आणि शिकार यामुळे ही जात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

असेही म्हणता येईल की, चिपांझीच माणसाचे पूर्वज असावेत. माणसांप्रमाणे चिपांझिंना वेगवेगळ्या फॅशनचे कपडे घालणे आवडेल; संधी मिळाली पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER