मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला, एमपीएसची पूर्व परीक्षा २१ मार्चला

The Chief Minister's promise was fulfilled, the pre-examination of MPSC will be held on March 21

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी एमपीएसीची पूर्व परीक्षा आता २१ मार्चला (21 March)होणार आहे. राज्यात कोरोना होणारा उद्रेक लक्षात घेता पूर्वनियोजित १४ मार्चला होणारी परीक्षा गुरूवारी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर काल राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांचा संताप लक्षात घेता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून येत्या आठ दिवसात परीक्षा घेण्याचे वचन दिले होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काल वचन दिल्याप्रमाणे, आज एमपीएसीने परीक्षेची  (MPSC Exam)नवी तारीख जाहीर केली आहे.

लोकसेवा आयोगाने आज नव्याने जारी केलेल्या परिपत्रकानुसार २१ मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्चला होणार आहे. तर ११ एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER