मुख्यमंत्र्यांचे विमान राजभवन टाळून महालक्ष्मीवरून धावले

uddhav tahckeray

मुंबई : कालच्या दिवसाची सुरूवात एका ऐतिहासिक प्रसंगाने झाली असे म्हटल्यास वावगे ठरमार नाही कारण राज्याचे प्रमुख असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना चक्क विमानात बसल्यानंतर कळले होते की, ठाकरे सरकारने त्यांना सरकारी विमान उड्डाणाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सकाळीच उत्तराखंडकडे निघालेल्या राज्यपालांना विमानातून उतरून राजभवनकडे माघारी परतावे लागले. हा राज्यपालांचा, राज्याच्या प्रमुख व्यक्तीचा मोठा अपमान असल्याच्या प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिल्या.

त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पालघरकडे उड्डाण करत होते. मात्र. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यालयाने राजभवनाच्या धावपट्टीचा वापर करणेच टाळले.

साधारण दक्षिण मुंबईतून उड्डाण घेताना शासकीय विमाने राजभवनावरील हेलीपॅडचा वापर करतात. मात्र,आाज मुख्यमंत्र्यांचे विमान राजभवनवरून न जाता महालक्ष्मीवरून गेले.

पालघरला जायचे ठरल्यानंतर विमान उड्डाणाची दिशा ठरवताना मुख्यमं६ी कार्यालयाने राजभवन हेलिपॅडचा वापर न करता महालक्ष्मी हेलिपॅडचे स्थान निश्चित केले.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे आज पालघरच्या आत आत पसरलेल्या गावांची पाहणी करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER