काँग्रेसच्या विरोधाला केराची टोपली ! मुख्यमंत्री कार्यालयाने औरंगाबादचा पुन्हा केला ‘संभाजीनगर’ उल्लेख

Uddhav Thackeray - CMO

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद (Aurangabad) नामांतराचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ (Sambhaji Nagar) उल्लेख केल्याबद्दल काँग्रेसने संताप व्यक्त केला होता. त्यानंतर काँग्रेसच्या विरोधाला केराची टोपली दाखवत मुख्यमंत्री कार्यालयाने आज पुन्हा औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला आहे !

काँग्रेसचा (Congress) नामांतरला विरोध आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला होता. यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया दिली होती.

आज CMO Maharashtra या अकाऊंटवरुन मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले, काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे.

आता यावर काँग्रेसची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER