५०-५० प्रमाणे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल : उद्धव ठाकरे

BJP-Shivsena

मुंबई :  लोकसभा निवडणुकीवेळी जेव्हा शिवसेना भाजपची युती झाली तेव्हा झालेल्या चर्चेत युतीचा 50 – 50 चा फार्म्युला ठरला होता. त्याप्रमाणेच विधानसभेत आता मुख्यमंत्रीपदाचा निर्ण होईल असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मतमोजणीच्या संध्याकाळी जवळपास सर्वच भागातील निकाल स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री कोणाचा असणार असा प्रश्न केला असता त्यांनी लोकसभेत युती करताना झालेल्या 50 – 50 च्या जागेची आठवण करून दिली.

ही बातमी पण वाचा :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ निकाल

महाराष्ट्र विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा होताना शिवसेनेने समसमान जागा मागितल्या होत्या परंतु त्यावेळी भाजप प्रदेशाध्यत्र चंद्रकांत पाटील यांनी आताची आमची अडचण समजून घ्या तर मी त्यांची अडचण समजून घेतली आणि कमी जागेवर लढण्यास मान्य केले परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत कोणतीही अडचण समजून घेणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

महाराष्ट्रातील जनतेनी अपेक्षीत कौल दिला आहे. लोकशाहीकडून हीच अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यात विरोधीपक्ष सक्षम हवा आणि विरोधी पक्षालाही चांगलं यश मिळालं आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, एकीकडे ही निवडणूक एकतर्फी होणार असं वाटतं होतं. परंतु ही निवडणूक एकतर्फी झाली नसल्याचं मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

50 -50 फार्म्युला म्हणजे राज्यात युतीचा मुख्यमंत्री असेल आणि अडीच वर्षे हे पद वाटून घेणार का, यावर भाजप काय निर्णय घेते याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. याचाच अर्थ ठाकरे घराण्यातील पहिला आमदार ठरलेल्या आदित्य ठाकरेंच्या गळ्यात पडणार असे दिसून येते.