कारशेडच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा सल्ला हा संवेदनाहीनतेचा पुरावा; भातखळकरांची टीका

Uddhav Thackeray & Atul Bhatkhalkar

मुंबई :विरोधकांनी (भाजपाने) कांजूरमार्गच्या कारशेडच्या बाबतीत केंद्र सरकारशी बोलावे, हा मुख्यमंत्र्यांचा शहाजोगपणाचा सल्ला खोटारडेपणा आणि जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसल्याचा, संवेदनाहीनतेचा पुरावा आहे, अशी टीका मुंबई भाजपाचे प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली. याबाबतच्या पत्रकात ते म्हणाले की, कांजूरमार्गच्या जागेवर अनेक दावे प्रलंबित आहेत.

दिवाणी न्यायालयामध्ये यासंदर्भातले दावे खासगी विकासकांचे प्रलंबित आहेत, हे सगळं लपवून ठेवून घाईगडबडीत, गुपचूप आणि मुख्यतः कायदा पूर्णतः धाब्यावर बसवून ही जमीन हस्तांतरित करण्याचा खटाटोप मुख्यमंत्र्यांनी पुत्रप्रेमापोटी आणि राजकीय स्वार्थापोटी केला. तो उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंगलट आल्यामुळेच मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) असा शहाजोगपणाचा आणि खोटा पवित्रा घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये मेट्रो कारशेडच्या निमित्ताने अनेक दावे केले. ते दावे पूर्णतः अशास्त्रीय असून वस्तुस्थितीला सोडून आहेत.

सत्तेवर आल्या आल्या आरेमधील कारशेडच्या कामाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली, त्याच वेळेला कांजूरमार्गमध्ये किंवा अन्य कुठे पर्यायी जागा मिळते का याची चाचपणी करायला सुरुवात केली. पण त्यांनीच नेमलेल्या सौनक समितीने आरेमध्येच कारशेड करणे कसे योग्य आहे हे विस्तृतपणे सांगितल्यानंतरसुद्धा हा समितीचा अहवाल कुठल्या मुद्द्यांवर त्यांनी फेटाळला हे त्यांनी जनतेला आज किंवा किमान विधानसभेत सांगण्याची आवश्यकता होती. पण कुठलेही योग्य उत्तर नाही, केवळ अहंकारातून हा निर्णय घेतल्यामुळे अहवाल जनतेपासून दडवून ठेवला, आजही पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात ‘खोटं  बोल पण रेटून बोल’ अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले  आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER