कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Today

मुंबई : राज्यात सध्या कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे . कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राचे खूप मोठं नुकसान झाले आहे. आता कोरोनाची तिसरी लाट भयावह असल्याचे वैैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट(3rd wave) ही भयावह असणार आहे. ही तिसरी लाट लहान (Coronavirus Children Infection)मुलांसाठी धोकादायक असल्याची महिती समोर येत आहे. त्यामुळेच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे |(Uddhav Thackeray) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केलं. कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करावेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आहे.

आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अनेक सुविधा आपण उभ्या केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तत्परतेनं आणि जलदगतीनं सुविधा उभारण्याचं काम करत आहेत, याचं समाधान आहे. राज्यातील औषधांचा पुरवठा सुरळीत होईल पण सध्या महत्त्वाची गरज आहे ती ऑक्सिजनची. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यादृष्टीनं जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे. ही चांगली बाब आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, कोरोना नियंत्रित आला असला तरी गाफिल राहू नका. हा विषाणू घातक आहे. सध्याचा म्युटेशन विषाणू जलदगतीने पसरत आहे. त्यावर आता आपल्याला मात करायची आहे, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button