मागणी पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यानी पंतप्रधान मोदींचे मानले मनःपूर्वक आभार

Maharashtra Today

मुंबई :- महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना (Corona) रुग्णांची संख्या लक्षात घेता केंद्राने रेमडेसिवीरचा अधिक प्रमाणात पुरवठा करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाक (Uddhav Thackeray) रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेली ही मागणी पंतप्रधान मोदींनी मान्य केली असून, देशातील इतर राज्याच्या तुलनेत रेमडेसिविरचा वाढीव साठा मंजूर केला आहे. २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत महाराष्ट्राला ४,३५,००० रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केलेली मागणी पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे मनःपूर्वक आभार मानले आहे.

राज्यात रेमडीसीवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे.

आज केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की , 21 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेमडीसीवीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button