पंतप्रधानांच्या भेटीआधी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे निर्णय घ्यायला हवे होते – विनायक मेटे

vinayak mete - Maharashtra today

पुणे :- मराठा आरक्षणासंदर्भात उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेणार आहे. मात्र त्यांची भेट घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या अधिकारात असलेल्या गोष्टी करायला हव्या होत्या, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केले.

या पार्श्वभूमीवर विनायक मेटे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत करतो. आम्ही बीडमध्ये काढलेल्या मोर्चानंतर राज्य सरकारला थोडी जाग आली. त्यामुळे आता मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला जाणार आहेत. या भेटीत मुख्यमंत्री पंतप्रधानांसमोर नेमके काय मुद्दे मांडणार आहेत, काय मागण्या करणार आहेत, हे जनतेला कळायला हवे. तसेच या भेटीपूर्वी राज्य सरकारने त्यांच्या अधिकारात असलेले निर्णय घ्यायला हवे होते. मराठा तरुणांच्या प्रलंबित असलेल्या नियुक्त्या मार्गी लावणे, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सोयी-सवलती देणे, या गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहेत. मात्र, गोष्टी न करता मुख्यमंत्री आता पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी जात आहेत. ही गोष्ट आकलनापलीकडची आहे, असे विनायक मेटे यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : संभाजीराजे आणि विनायक मेटेंना एकत्र आणण्याचे प्रयत्न; विखे-पाटलांची माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button