मुख्यमंत्री भेटतच नाहीत, रवी राणांनी केबिनलाच चिटकवले निवेदन

Cm Thackeray-Ravi Rana

मुंबई : सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा(Corona) संसर्ग वाढला असून, सर्व जिल्ह्यांमध्ये उपाययोजनांवर भर दिला जात आहे. अमरावती जिल्ह्यातही कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यावर विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. यासाठी बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवी राणा (Ravi Rana)यांनी वेळोवेळी प्रशासनाला विशेष लक्ष घालण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाच्या उदासीन कारभारावर नाराजी व्यक्त करत रवी राणा यांनी थेट मंत्रालय गाठून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री सध्या मंत्रालयात येत नसल्याने त्यांच्या कॅबिनचा दरवाजा बंद होता. त्यामुळे नाईलाजास्तव रवी राणा यांनी आपले निवेदन कॅबीनच्या दारावरच्या चिटकवले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटच होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या केबिनला आपल्या मागण्यांचं निवेदन चिटकवून रवी राणा यांनी एकप्रकारे निषेध नोंदवला. कोरोनाच्या संकटकाळातही मुख्यमंत्री भेटत नसतील तर हाच एक पर्याय असल्याचे म्हणत त्यांनी निषेध व्यक्त केला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button