वाढीव विजबिलासंदर्भात मुख्यमंत्री आज निर्णय घेण्याची शक्यता

CM Uddhav Thackeray-Nitin Raut

मुंबई :  कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देश गेले सात महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये आहे. पहिले तीन महिने हा लॉकडाऊन अत्यंत कडक ठेवण्यात आला होता. त्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वचजणांना घरात बसण्यास सरकारने विनंती केली होती. त्यामुळे त्या तीन महिन्यात मीटर रिडींग वा बील देणे टाळले. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर एकाचवेळी अव्वाच्या सव्वा वीजबिले पाठवण्यात आली. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. ग3ाहकांच्या तक्रारी लक्षात गेऊन उर्जामंत्र्यांनी यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते.

त्या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

उर्जा मंत्री राऊत ( Nitin Raut) यांनी दिवाळी आधी वाढीव वीज बिल संदर्भात दिलासा देणारा निर्णय होणार असल्याचे संकेत दिले होते त्यानुसार आज महत्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काही निर्णय होतोय का याकडे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER