
मुंबई : डोंबिवलीतील मनसे कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी राजेश कदम, सागर जेधे, दीपक भोसले, अर्जुन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थानी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नागरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील शिवसेना नेते उपस्थित होते. शिवसेनेत सर्वांचं स्वागत आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची ताकद आहेच. पण ती अजून वाढत आहे. सर्वच ठिकाणी विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी भगव्याखाली येत आहेत. या तरुणांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचं काम आम्ही करू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली. बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको. पण जे काही ऐकायला आलंय त्यावरून बजेट देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नको, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. अर्थसंकल्पाची सर्व माहिती घेऊन त्याचा सारांश समजून घेऊन मी त्यावर भाष्य करेल, असंही ते म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला