…शरजील पुण्यात येऊन गेला हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते? आशिष शेलार यांनी विचारले

Ashish Shelar - Uddhav Thackeray

मुंबई : पाताळाची चर्चा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शरजील पुण्यात आला, हे माहिती नव्हते का? असा प्रश्न भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारला आहे. या संदर्भात शेलार यांनी ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पत्रपरिषदतेत शेलार (Ashish Shelar) यांच्यासोबत भाजपाचे (BJP) प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

शर्जिलला पाताळातून शोधून काढू, असे सरकारने म्हटले होते. याचा संदर्भ घेऊन शेलार म्हणाले, “पाताळाची चर्चा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शरजील पुण्यात आला, हे माहिती नव्हते का? माध्यमांमधून माहिती उघड होते आहे! आम्ही त्या वेळीही म्हटले होते की, हिंदुंना ‘सडक्या मनोवृत्तीचे’ म्हणणारा, हिंदू विरोधी बोलणारा, हिंदू धर्माचा अपमान करणारा शरजील इथल्या भाषणानंतर पळून कसा गेला? त्या भाषणानंतर काही दिवस तो मुंबईत होता. त्याला मुंबईतून बाहेर जाण्यासाठी ‘ग्रीन चॅनल’ कुणी दिला? सरकारमधील कोणत्या मंत्र्याने दिला? त्या ग्रीन चॅनलमधून त्याला पळवण्यााच मार्ग खुला कुणी केला? त्यानंतर आज परत ‘रेड कार्पेट’ कुणी दिला? आमचा आरोप आहे की सरकारमधील दोन मंत्र्यांचा या मागे हात आहे. त्या दोन मंत्र्यांचे कामच हिंदू विरोधी कुणी काही म्हटले तर त्याचे समर्थन व प्रदर्शन करणे आहे. हिंदू धर्माला कुणी शिव्या दिल्या की या ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या दोन मंत्र्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयावर दबाव येतो, असा संशय बळावतो, असे शेलार म्हणालेत.

या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरजीलच्या मुद्यावरून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकावर जोरादरा टीका केली होती.

“शरजील उस्मानी हा उत्तर प्रदेशचा असल्याचे मुख्यमंत्री सांगत होते, पण त्या शरजील उस्मानीची हिंदुंच्या विरुद्ध उत्तर प्रदेशात बोलायची हिंमत नाही. तो आमच्या महाराष्ट्रात येतो आणि पुण्यात येऊन बोलून जातो. त्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही, हे या सरकारचे हिंदुत्व! या शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शरजील उस्मानीच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER