मुख्यमंत्री स्वतःचे कुटुंबही सुरक्षित ठेवू शकले नाहीत, ते हतबल झाले; प्रवीण दरेकरांची टीका

CM Uddhav Thackeray - Pravin Darekar

मुंबई :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी वाढत्या कोरोना संसर्गावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबाचंही संरक्षण करू शकले नाहीत, ते आता मुख्यमंत्री हतबल आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

काल मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांवरही टीका केली. मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. काय उपयायोजना करायच्या हे ते लोकांनाच जनतेलाच विचारत आहेत. कोरोनाच्या संकटात जनतेला मदत काय करणार हे मुख्यमंत्री सांगत नाहीत, असं दरेकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आमची काळजी करू नये. आम्ही रस्त्यावर उतरूच. तुम्ही मातोश्रीत बसून होतात. त्याकाळातही आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो. पण तुम्ही लोकांमध्ये जा आणि लॉकडाऊनमुळे होणारं त्यांचं नुकसान समजून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला. आम्ही राजकारण करत नाही. मुख्यमंत्री म्हणतात विरोधक राजकारण करत आहेत. विरोधकांनी राजकारण करू नये. असं सांगतानाच मुख्यमंत्रीच स्वत: शेरेबाजी करत विरोधकांवर टीका करत आहेत. हे राजकारण नाही का? असा सवाल करतानाच कोरोनाला सव्वा वर्षे झाले आहे. या सव्वा वर्षात मुख्यमंत्र्यांनी केवळ विरोधकांशी एकदाच संवाद साधला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत विरोधकांशी काहीच चर्चा केली नाही. मुख्यमंत्र्यांचा केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे. सत्ताधाऱ्यांच्या पायात पाय नाही. त्यांच्यातच समन्वय नाही. तुम्हीच पायात पाय घालून पडणार आहात, असा चिमटाही त्यांनी काढला.

राज्यातील आरोग्य यंत्रणा फोल ठरली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. पण त्यांच्या कुटुंबालाही ते सुरक्षित ठेवू शकले नाहीत. कारण सरकार संभ्रमावस्थेत आहे. यावेळी त्यांनी आव्हाडांवर टीका केली. आव्हाड म्हणतात २० लाख कोटी रुपयांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले? आव्हाडांनी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले हे एकदा तपासून पाहवं. केंद्र सरकारने इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक मदत केली आहे. केंद्र सरकारने अन्नधान्यांपासून ते कोरोनाच्या लसीपर्यंत सर्व सुविधा महाराष्ट्राला दिल्या आहेत. त्याची आव्हाडांना कल्पना नसावी. पण आम्ही आव्हाडांना त्याची आकडेवारीच पाठवून देऊ, असं सांगतानाच केवळ अपयश आल्याने आघाडी सरकारकडून भावनिक आवाहन केलं जात आहे. लोकांना संभ्रमित केलं जात आहे, असंही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : लोकांना त्रास होईल असा कुठलाही निर्णय भाजप खपवून घेणार नाही – प्रवीण दरेकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button