मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुलांचा हट्ट पुर्ण करण्यासाठी ‘आरे’ची जागा बदलली : निलेश राणे

CM Uddhav Thackeray - Aaditya Thackeray - Nilesh Rane

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजुरमार्गला होणार असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर अनेकांनी याचे स्वागत केले तर, विरोधकांकनी कडाडून टीका केली आहे.

त्यातच शिवसेनेचे (Shiv Sena) कट्टर शत्रू राणे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. “आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट. करोडो रुपये वाया जाणार, नवीन परवानग्या कधी मिळतील व मिळतील की नाही माहीत नाही, कारण ती जमीन भुसभुशीत (खारफुटी सारखी) आहे. किमान ५ हजार कोटी या नवीन उभारणीसाठी लागणार… आधीचे पैसे गेले,” असे ट्विट करत निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला.

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या आरे कारशेडच्या जागेच्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पर्यायी जागेचा तोडगा जाहीर केला. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ची आरेतील कारशेड रद्द करून ती जागा राखीव वन जाहीर करतानाच मुख्यमंत्र्यांनी कारशेड कांजूरमार्गला उभारणार असल्याचे स्पष्ट केले. मुक्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर समर्थकांकडून स्वागत तर विरोधकांकडून टीका होत आहे.

उल्लेखणीय म्हणजे राज पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल राज्य सरकारचे आभार मानले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER