मुख्य न्यायाधीशांनी माध्यमांना करून दिली जबाबदारीची जाणीव

Bombay High Court - Justice Dipankar Datta - Maharashtra Today
Bombay High Court - Justice Dipankar Datta - Maharashtra Today
  • ‘टीआरपी’साठी भडक वृत्ते न देण्याची सूचना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) मुख्य न्यायाधीश न्या. दीपंकर दत्ता (Justice Dipankar Datta) यांनी गुरुवारी माध्यमांना त्यांच्या जबाबदारीची जाीणीव करून दिली आणि खास करून इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी सनसनाटी व भडक वृत्ते देण्याचे टाळावे, असे आवाहन केले. खास करून राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर असताना त्यासंबंधी न्यायालयात होणाºया सुनावणीच्या बातम्या देताना माध्यमांनी संयम आणि विवेक बाळगायला हवा, असेही मुख्य न्यायाधीश म्हणाले.

राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि प्रशासनाकडून त्याची कथित गचाळ पद्धतीने केली जाणारी यासंबंधी पक्षकारांनी केलेल्या काही व न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका म्हणून हाती घेतलेले एक अशा काही याचिकांवर गुरुवारी मुख्य न्यायाधीश न्या. दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुमारे पाच तास सविस्तर सुनावणी झाली. आज झालेल्या सुनावणीच्या अनुषंगाने न्यायालयाचे आदेशवजा निकालपत्र गुरुवारी रात्रीपर्यंत न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध केले जाईल, असे मुख्य न्यायाधीशांनी सांगितले.

सुनावणीस सुरुवात करण्यापूर्वी, उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींना उद्देशून मुख्य न्यायाधीशांनी आपल्या मनातील विचार आणि काहीशी नाराजीही व्यक्त केली. मुख्य न्यायाधीश म्हणाले की, आम्ही अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत काम करत आहोत, याची कृपया जाणीव ठेवा. ही वेळ सनसनाटी आणि खमंग बातम्या देण्याची नाही. काही वेळा सुनावणी सुरु असताना आम्ही उद्वेगाने काही भाष्ये करतो. पण ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी अशा आमच्या भाष्याचे ठळक मथळे करून बातम्या देणे योग्य नाही.

मुख्य न्यायाधीश पुढे म्हणाले की, माझ्या न्यायालयात जनहित याचिकांवर होणाºया सुनावणीचे वृत्तांकन करण्याच्या संदर्भात काही माध्यम प्रतिनिधी गेल्या वर्षी मला भेटले होते. मी त्यांना न्यायालयात होणाºया संभाषणाच्या बातम्या न देण्याच्या अटीवर परवानगी दिली होती. पण माध्यम प्रतिनिधी त्याचे पालन करत नाहीत, हे मला खेदाने सांगावे लागत आहे. आम्ही न्यायालयात जे बोलतो त्याच्या बातम्या देणे अजूनही सुरु आहे.

यापैकी एक याचिका एका महिला वकिलाने केली आहे. त्या याचिकेत याचिकाकर्तीच्या प्रतिपादनांच्या पुष्ठ्यर्थ काही राजकीय नेत्यांनी केलेल्या ट्वीटचा संदर्भ देण्यात आला आहे. याचिका कायद्याच्या मुद्द्यांपुरती मर्यादित न ठेवता त्यात राजकारण घुसडल्याबद्दल मुख्य न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त करून याचिकाकर्तीच्या वकिलास बुधवारी खडसावले होते. त्या वकिलाने त्याबद्दल लगेच दिलगिरीही व्यक्त केली होती. त्या संपूर्ण संवादाच्या सविस्तर बातम्या माध्यमांमध्ये दिल्या गेल्या. त्याअनुषंगाने वरीलप्रमाणे माध्यमांचे कान टोचले. ते म्हणाले की, आम्ही जे भाष्य केले ते याचिका कशी असू नये याविषयी होते. याचिकाकर्तीस किंवा त्या संपूर्ण वर्गास (वकील) कमी लेखणे हा त्यामागचा हेतू नव्हता.

तीन-चार न्यायाधीशांना व काही कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील काही कर्मचारी दुर्दैवाने दगावलेही आहेत. परिस्थिती बिकट आहे. तेव्हा माध्यमांनी बातम्या देताना संवेदनशीलता ठेवावी, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button